ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागेवर ९०० रुग्णशय्यांचे बहुविध सुविधा रुग्णालय – उद्या भूमिपूजन सोहळा
ठाणे दि.२१ :- ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागेवर ९०० रुग्णशय्यांचे बहुविध सुविधा रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा उद्या (२२ एप्रिल) रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या रुग्णालयाच्या जागेवर बहुसुविधा रुग्णालय करण्याचा निर्णय घेऊन त्यासंबंधीचा प्रस्ताव ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी तयार केला होता. १२ एप्रिल रोजी जुने दगडी बांधकाम असलेली इमारत पाडण्यात आली.
ट्रक बंद पडल्याने मुंबई-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी ऐरोलीपर्यंत वाहनांच्या रांगा
नारायण विठ्ठल सायन्ना यांनी ही इमारत त्यांचे वडील विठ्ठल सायन्ना यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रुग्णालयासाठी दान केली होती नवीन रुग्णालयात ५०० रुग्णशय्यांचे जिल्हा रुग्णालय, प्रत्येकी २०० रुग्णशय्यांचे सेवा आणि महिला व बाल रुग्णालय असणार आहे. न्यूरॉलॉजी, ॲान्कोलाॅजी व ऑन्को सर्जरी सेक्शन, कार्डिओलॉजी व कार्डिओ व्हॅस्क्युलर सेक्शन आणि नेफ्रॉलॉजी व डायलिसिस सेक्शन यांसारख्या अत्याधुनिक उपचार सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या महापालिका अधिका-याला मारहाण
कर्करोग, हृदरोग, मेंदूशी संबंधित आजार, श्वसनाशी संबंधित विकार या आजारांवरही उपचार केले जाणार आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजिनक बांधकाम विभाग मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत.