‘प्लॅनेट मराठी’ वर ‘सुमी’ चित्रपट प्रदर्शित होणार
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.११ :- एका महत्त्वाकांक्षी, ध्येयनिष्ठ मुलीची गोष्ट असलेला ‘सुमी’ चित्रपट ‘प्लॅनेट मराठी’ या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. ‘६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२’मध्ये या चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटा’चा पुरस्कार मिळाला. चित्रपटातील आकांक्षा पिंगळे , दिव्येश इंदुलकर हे ही ‘सर्वोत्कृष्ट बाल कलाकार’ पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
अक्षय बर्दापूरकर आणि ‘प्लॅनेट मराठी’ प्रस्तुत हर्षल कामत एन्टरटेनमेन्ट व गोल्डन माउस प्रोडक्शन यांनी ‘सुमी’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. दगडाच्या खाणीत काम करणाऱ्या कामगाराच्या मुलीची ही गोष्ट आहे. अजुनही बऱ्याच ठिकाणी मुलींच्या शिक्षणाला महत्त्व दिले जात नाही. मात्र, त्याला अपवाद ठरवत सुमी कसे शिक्षण घेते याची ही कथा दिग्दर्शक अमोल गोळे यांनी मांडली आहे. चित्रपटात स्मिता तांबे, नितीन भजन यांच्याही प्रमुख भूमिका आहे. चित्रपटाची मूळ कथा – पटकथा संजीव झा यांची आहे.