शववाहिका सेवा उपलब्ध करून देण्याबाबत राज्याने विचार करावा: राज्यपाल रमेश बैस
मुंबई दि.२४ :- रुग्ण दगावला आणि शव नेण्यासाठी शववाहिका उपलब्ध नसली तर ग्रामीण भागात रुग्णाच्या नातलगांना नाईलाजाने शव उचलून न्यावे लागते. त्यामुळे मृतदेह नेण्यासाठी शववाहिका सेवा उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केली. राजभवन येथे झालेल्या एका बैठकीत राज्यपाल बैस यांनी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ तानाजी सावंत उपस्थित होते.
तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या पाचव्या सत्राचा निकाल जाहीर
घटनेच्या पाचव्या अनुसूचिनुसार राज्यातील अनुसूचित भागांच्या विकासाकडे लक्ष देण्याची जबाबदारी आपणाकडे आहे असे नमूद करून आरोग्य योजनांचा लाभ अनुसूचित भागांमध्ये किती प्रभावीपणे होत आहे याची माहिती देण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी केली. ग्रामीण आणि दुर्गम भागात विशेषज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. विशेषज्ञ डॉक्टर्स ग्रामीण भागात काम करण्यास तयार होत नाहीत, याचा विचार करून त्यांना अतिरिक्त प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत आपण प्रस्तावित केले असल्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी यावेळी सांगितले.
आचार्य अत्रे जयंती कार्यक्रम समितीतर्फे आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा
सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर व आरोग्य आयुक्त धीरज कुमार यांनी राज्यातील सार्वजनिक आरोग्य सुविधा, आरोग्य सेवेतील मनुष्यबळाची सद्यस्थिती व रिक्त पदे, विभागाचे यशस्वी उपक्रम, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्प याबाबत राज्यपालांना माहिती दिली.
