शंकर महादेवन अकादमीचे १२ ऑगस्ट रोजी उदघाटन
डोंबिवली दि.०८ :- टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ आणि गायक शंकर महादेवन अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीत विद्यार्थी आणि युवकांना संगीत विषयाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उदघाटन येत्या १२ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजता ज्येष्ठ गायक व कोंकण प्रांत ‘ संस्कार भारती ‘ चे उपाध्यक्ष पं. मुकुंद मराठे यांच्या हस्ते होणार आहे.
जमशेदजी टाटा आत्मनिर्भर भारताचे आद्य पुरस्कर्ते – राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन
अकादमीतर्फे १० ते २४ वयोगटातील विद्यार्थी आणि युवकांना शास्त्रीय गायन आणि पाश्चिमात्य वाद्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी, युवकांना गायन, गिटार, कॅसिओ आदीचे प्रशिक्षण जवळपास निःशुल्क देण्यात येणार आहे.
एडलवाइज कंपनीच्या अधिकाऱ्यांना उद्या खालापूर पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश
पेंढरकर सभागृह, टिळकनगर विद्या मंदिर, डोंबिवली पूर्व येथे होणा-या कार्यक्रमास डोंबिवलीकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह आशीर्वाद बोंद्रे यांनी केले आहे.