ठळक बातम्या

जमशेदजी टाटा आत्मनिर्भर भारताचे आद्य पुरस्कर्ते – राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन

मुंबई दि.०७ :- देश पारतंत्र्यात असताना अनेक अडचणींवर मात करीत देशात उद्योग साम्राज्य उभे करणारे, तसेच बंगलोर येथील भारतीय विज्ञान संस्थेच्या स्थापनेत महत्वपूर्ण योगदान देणारे उद्योगपती जमशेदजी टाटा हे आत्मनिर्भर भारताचे आद्य पुरस्कर्ते होते, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले

मधु मंगेश कर्णिक यांना ‘आचार्य अत्रे’ पुरस्कार जाहीर

मुंबई विद्यापीठ तसेच विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित केलेल्या ‘जमशेदजी टाटा : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाची अज्ञात गाथा’ या विषयावरील परिसंवादात राज्यपाल बैस बोलत होते. अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर,सीएसआयआरचे माजी संचालक तसेच विज्ञान भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शेखर मांडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ रवींद्र कुलकर्णी, प्र कुलगुरु प्रा. अजय भामरे तसेच इतर निमंत्रित उपस्थित होते.

एडलवाइज कंपनीच्या अधिकाऱ्यांना उद्या खालापूर पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश

कृत्रिम प्रज्ञा व यंत्र शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होणे अटळ आहे. लिखाण, वाचन व अंकगणित ही कौशल्ये मागे पडतील. एका अहवालानुसार जगभरात ४० ते ८० कोटी नोकऱ्या बाधित होतील तरअनेक लोकांना इतर क्षेत्रात काम करावे लागेल. आजच्या काळात टिकण्यासाठी प्रत्येकाला एकापेक्षा अधिक कौशल्ये आत्मसात करावी लागतील तसेच सातत्याने नवनव्या गोष्टी शिकत राहावे लागेल, असेही राज्यपालांनी सांगितले.

शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक ९ ते १४ ऑगस्ट दरम्यान पर्यायी मार्गाने

तर उद्योगपती जमशेदजी टाटा यांनी निव्वळ व्यापारी मानसिकता न ठेवता उद्यमशीलतेच्या मानसिकतेला प्राधान्य दिले , त्यामुळे नीतिमत्ता व मूल्यांवर आधारित एका प्रगत समाजाची निर्मिती झाली, असे अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर म्हणाले. डॉ मांडे यांनी टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ‘विद्यार्थी विज्ञान मंथन’ परीक्षा माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *