वाढते प्रदुषण, धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिका स्तरावर कृती दलाची स्थापना

मुंबई दि.२६ :- मुंबईतील हवेतील वाढते प्रदुषण, धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिका प्रशासन स्तरावर कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक विभागामध्ये तीन विषयांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे तीन कृती दल काम करणार आहेत.

महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मनात शाहीर साबळे यांचे स्थान अढळ- शरद पवार

डिसेंबरपासून मुंबईमधील हवेतील प्रदुषण मोठ्या प्रमाणावर वाढले असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी १२ मार्च रोजी सात सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने मार्च अखेरीस आपला अहवाल महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना सादर केला होता.

पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्याला यलो ॲलर्ट जारी

धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी संबंधित विभागांनी धूळ निर्माण करणाऱ्या घटकांवर व क्षेत्रांवर लक्ष ठेवावे, असे या अहवालात नमुद करण्यात आले होते तसेच १ एप्रिलपासून अहवालाची अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. मात्र विभाग स्तरावर अशी पथके स्थापन करण्यात आली नव्हती. त्याची सुरुवात आता झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.