गावदेवी मंदिराजवळ उभारलेली बेकायदा इमारत तोडण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त द्या
मुंबई उच्च न्यायालयाचे महाराष्ट्र शासनाला आदेश
डोंबिवली दि.०८ :- डोंबिवली पूर्व मानपाडा रस्त्यावरील गावदेवी मंदिराजवळ भूमाफियांनी उभारलेली बेकायदा इमारत तोडण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाला पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करुन द्यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय, न्यायमूर्ती आरिफ डाॅक्टर यांच्या खंडपीठाने शासनाला दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यालयाचे उद्या उदघाटन
गावदेवी येथील बेकायदा इमारत प्रकरणात उच्च न्यायालयाने लक्ष घातल्याने कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने बेकायदा इमारत भुईसपाट करण्याचे नियोजन केले आहे. गेल्या आठवड्यापासून इमारत जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू आहे. ही बेकायदा इमारत पाडताना भूमाफियांकडून धोका होण्याची भीती असल्याने याठिकाणी वाढीव पोलीस बंदोबस्त आवश्यक असल्याचे पालिकेतर्फे सल्लागार वकील ॲड. ए. एस. राव आणि ॲड. प्रशांत कांबळे यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने दखल घेऊन तातडीने पालिकेला गावदेवी येथील बेकायदा इमारत पाडण्यासाठी आवश्यक पोलीस बळ उपलब्ध करुन देण्याचे आदेश शासनाला दिले.
चेतन सिंहला ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
गेल्या नऊ महिन्याच्या काळात सात ते आठ भूमाफियांनी मानपाडा रस्त्यावर गावदेवी मंदिराजवळ उद्यानासाठी आरक्षित भूखंडावर सात मजली बेकायदा इमारत उभारली. या इमारती विषयी तक्रारी करुन पालिका इमारत तोडत नसल्याने वास्तुविशारद संदीप पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन इमारत जमीनदोस्त करण्याची मागणी केली होती. विधीमंडळ अधिवेशनातही या इमारतीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.