राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यालयाचे उद्या उदघाटन
ठाणे दि.०८ :- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यालयाचे उदघाटन उद्या (बुधवार) ठाणे येथे होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित राहणार आहेत.
चेतन सिंहला ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
राष्ट्रवादी पक्षातील बंडानंतर ठाणे जिल्ह्यात दोन गट पडले आहेत. पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तर आमदार जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत आहेत. ठाण्यातील पाचपखाडी भागात राष्ट्रवादी पक्षाचे कार्यालय असून ती जागा आव्हाड यांच्या मालकीची आहे.
राज्यातील आर्थिक गैरव्यवहाराची प्रकरणे आता सीबीआय विशेष न्यायालयांमध्ये
त्यामुळे परांजपे, मुल्ला यांनी फ्लॉवर व्हॅली संकुल परिसरात नवे कार्यालय घेतले आहे. संध्याकाळी साडेसहा वाजता उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते या कार्यालयाचे उदघाटन होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अजित पवार गटाचे इतर पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.