ठळक बातम्या

काश्मीरमधील महिला सबलीकरणाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे- पंकजा दीदी

मुंबई दि.२६ :- काश्मीरमधील व्यवसायाभिमुख शिक्षण, आरोग्य आणि महिला सबलीकरणातील अनुशेष भरून काढण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन किलांबी पंकजा वल्ली ऊर्फ पंकजा दीदी यांनी केले येथे केले. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे देण्यात येणारा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप घरत यांच्या हस्ते पंकजा दीदी यांना प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि ५१ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

‘वंदे भारत’ एक्स्प्रेसच्या माध्यमातून रेल्वला भरघोस उत्पन्न

पंकजा दीदी गेली सुमारे २७ वर्षे जम्मू काश्मीर मध्ये अदिती सेवा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून महिला सबलीकरणाद्वारे राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करत आहेत. पंकजा दीदी यांची मुलाखत ‘ ‘हम’ संस्थेच्या नंदिनी पित्रे यांनी घेतली. त्यावेळी पंकजा दीदी बोलत होत्या. जेव्हा दहशतवाद टोकाला पोहोचला होता त्याचे सर्व समाजावर परिणाम झालेच परंतु त्यातही महिला आणि लहान मुले सर्वात जास्त पीडित आहेत, असेहीत्यांनी सांगितले. ३७० आणि ३५ ए रद्द झाल्यानंतर महिलांच्या परिस्थितीत सुधारणा होत आहे असेही त्या म्हणाल्या.

बिहार शासनाच्या जातीनिहाय जनगणनेचा अभ्यास करून महाराष्ट्राबाबत निर्णय- उपमुख्यमंत्री फडणवीस

प्रास्ताविक आशीर्वाद बोंद्रे यांनी केले तर अर्चना जोशी यांनी पंकजा दीदी यांचा परिचय करून दिला. कार्याध्यक्ष श्रीकांत पावगी यांनी आभार मानले, कु. रिद्धी करकरे हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पुरस्कार प्रदान समारंभापूर्वी डोंबिवलीतील विविध रोटरी क्लबचे सदस्य तसेच शिक्षण संस्थांचे पदाधिकारी यांच्याशी पंकजा दीदी यांनी स्वतंत्रपणे संवाद साधला आणि त्यांना अदिती सेवा प्रतिष्ठानच्या कार्याला मदत करण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *