मरिन लाईन्स येथे इमारतीचा काही भाग कोसळून तीन जण जखमी
मुंबई दि.०४ :- मरिन लाईन्स येथील शामलदास जंक्शनजवळील एका इमारतीचा काही भाग शुक्रवारी सकाळी कोसळला. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची अद्याप ओळख पटलेली नाही.
सेवानिवृत्तीनंतरही म्हाडा’ची घरे न सोडणा-या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई
इमारतीच्या दुरुस्तीसाठी मेहकर हाऊस येथे परात उभारण्यात आली होती. इमारतीची एक भिंत सज्जासह अचानक खाली कोसळली. त्यामुळे त्याला लागून उभारलेली परात खाली पडली. अर्जुन खान (२६),बापुन शेख (२०) हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.