सेवानिवृत्तीनंतरही म्हाडा’ची घरे न सोडणा-या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई
मुंबई दि.०४ :- सेवानिवृत्तीनंतरही गेल्या काही वर्षांपासून ‘म्हाडा’ ची सेवानिवासस्थाने न सोडणा-या माजी अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. म्हाडाची सेवानिवासस्थाने शंभरहून अधिक निवृत्तांनी बळकावली आहेत. त्यामध्ये अनेक निवृत्त अभियंत्यांचाही समावेश आहे. ही घरे मालकी हक्काने देण्याचा निर्णय शासनाकडे प्रलंबित आहेत, असा दावा या निवृत्तांनी केला होता.
अकरावी प्रवेशाची दुसरी विशेष प्रवेश यादी जाहीर
२००९ मध्ये तत्कालीन म्हाडा उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम चॅटर्जी यांनी परिपत्रक काढून यापुढे सेवानिवासस्थाने मालकी हक्काने देता येणार नाहीत असे स्पष्ट केले होते. ही सेवानिवासस्थाने मालकी हक्काने न देण्याचा निर्णय २००९ मध्येच झाला होता. परंतु त्याची अंमलबजावणी केली जात नव्हती. मात्र आता ती केली जाणार असल्याचे सांगण्यात येते.