कुलकर्णी परिवारातर्फे २९ एप्रिलरोजी ‘गझलभान’ कार्यक्रमाचे आयोजन
डोंबिवली दि.२५ :- कुलकर्णी परिवारातर्फे येत्या २९ एप्रिलरोजी ‘गझलभान’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कवी चंद्रशेखर सानेकर यांच्या ‘ एकटे दुकटे शेर’ या संग्रहाच्या निमित्ताने गझलचर्चा होणार आहे.
पोलीस दलात फेरबदल, सदानंद दाते यांना महासंचालकपदी बढती
कार्यक्रमात चंद्रशेखर सानेकर, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम शिधये, रवींद्र लाखे आणि ज्येष्ठ पत्रकार, ‘ग्रंथाली’चे संस्थापक दिनकर गांगल सहभागी होणार असून गणेश कुलकर्णी सूत्रसंचालन करणार आहेत.
कोंढवा येथील शाळेत दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण केंद्र ही गंभीर बाब- डॉ. रिंकू वढेरा
हा कार्यक्रम संध्याकाळी साडेसहा वाजता कानविंदे क्रीडाभवन, दुसरा मजला, वल्लभभाई पटेल रस्ता, पेंडसे नगर, डोंबिवली पूर्व येथे होणार आहे. कार्यक्रमासाठी सर्वांसाठी खुला आहे.