पोलीस दलात फेरबदल, सदानंद दाते यांना महासंचालकपदी बढती

मुंबई दि.२५ :- महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख सदानंद दाते आणि ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजीत सिंह यांना महासंचालकपदी बढती देण्यात आली असून दोघांनाही त्यांच्या पदांवर कायम ठेवण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त अभिनव देशमुख यांना मुंबईच्या दक्षिण प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त पद देण्यात आले आहे. अनिल पारसकर यांना मध्य विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.

आशा भोसले यांना ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ प्रदान

मुंबईच्या वाहतूक विभागाच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तपदी एम.रामकुमार यांना पदोन्नती देण्यात आली आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले विरेंद्र मिश्रा यांच्याकडे विशेष शाखेच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तपदाची; तर दीपक साकोरे यांच्याकडे नवी मुंबईच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पंजाबराव उगले यांची बदली ठाण्यातील गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तपदी करण्यात आली आहे.

कोंढवा येथील शाळेत दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण केंद्र ही गंभीर बाब- डॉ. रिंकू वढेरा

बिपीन कुमार सिंह यांना पदोन्नती देत त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे छत्रपती संभाजी नगरचे पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांच्या जागी पिंपरी चिंचवडचे पोलिस सहआयुक्त मनोज लोहिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.