पत्रकार सन्मान योजनेच्या जाचक अटी शिथिल होणार
मुंबई दि.२५ :- बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेतील जाचक अटी लवकरच शिथिल करण्यात येतील, अशी घोषणा मंत्री शंभूराजे देसाई यांनी आज विधान परिषदेत केली. मराठी पत्रकार परिषदेच्या पिंपरी चिंचवड येथील अधिवेशनात परिषदेने केलेल्या मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेन्शन योजनेत वाढ करून ती ११ हजार रुपयांवरुन २० हजार रूपये करण्याची घोषणा केली होती.
राज्याच्या विकासासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यावर भर देणार- उपमुख्यमंत्री अजित पवार
मात्र त्याचा शासनादेश निघाला नव्हता तो दोन दिवसात काढण्याची घोषणाही आज करण्यात आली. विधान परिषदेत विविध आमदारांनी आज लक्षवेधीच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न उपस्थित केले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. पत्रकारांचे सर्व प़श्न सोडविण्यासाठी एक अभ्यासगट नेमण्यात येईल, केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील डिजिटल माध्यमांसाठी धोरण आखले जाईल, असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.
