‘निसर्गकवी’ ना. धो. महानोर यांचे निधन
पुणे दि.०३ :- ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ‘निसर्ग कवी’ अशी ओळख असलेल्या महानोर यांचे कवितासंग्रह वाचकप्रिय ठरले. यात अजिंठा हे दीर्घ काव्य तसेच गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, दिवेलागणीची वेळ, पावसाळी कविता, रानातल्या कविता यांचा समावेश आहे. गपसप, गावातल्या गोष्टी हे कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत.
मुंबई – पुणे एक्स्प्रेस द्रुतगती महामार्गावर दोन ट्रकचा अपघात, एक जण ठार
अबोली, एक होता विदूषक विदूषक, जैत रे जैत, दोघी, मुक्ता सर्जा, अजिंठा आदी चित्रपटांसाठी महानोर यांनी गीतलेखनही केले होते. १९७८ मध्ये महानोर यांची महाराष्ट्र विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती झाली होती. महानोर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी त्यांच्या पळसखेड या गावी अंत्यसस्कार करण्यात येणार आहेत.
महानोर यांना श्रद्धांजली
राज्यपाल रमेश बैस- ना धों महानोर यांनी आपल्या लेखणीतून जनसामान्यांच्या मनाचा ठाव घेतला. त्यांचे साहित्य व काव्य हे वास्तवदर्शी व हृदयाला भिडणारे होते. त्यांची अनेक गीते लोकांच्या मनात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- ना. धो. महानोर यांनी आपल्या शब्द सामर्थ्याने निसर्गाची, राना- वनातील, पानाफुलांतील सौंदर्याची अनेकविध रूपे रसिकांसमोर मांडली. ते प्रयोगशील शेतकरी होते. मातीत रमणारा, निसर्गाची अनेक रुपे आपल्या शब्दांतून उलगडून दाखवणारा संवेदनशील रानकवी हरपला.