मध्य रेल्वेवर मे महिन्यात वातानुकूलित लोकलने दररोज ५८ हजार प्रवाशांचा प्रवास

मुंबई दि.२६ :- मे महिन्याच्या अवघ्या २४ दिवसांत दररोज ५८ हजार प्रवाशांनी वातानुकूलित लोकल प्रवासाला प्राधान्य दिले, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

गुणवत्ता वाढीसाठी विशेष कृती आराखडा – यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी

२०२३ या वर्षीच्या पाच महिन्यांत मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकलमधून ७१.३३ लाख प्रवाशांनी प्रवास केला. गेल्यावर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यात वातानुकूलित लोकल प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

संयुक्त राष्ट्र संघातर्फे बँकॉक येथे बुद्ध पौर्णिमा महोत्सव  

मध्य रेल्वेवर चार वातानुकूलित लोकल असून या लोकलच्या दररोज ५६ फेऱ्या होतात. रविवार आणि सुट्टीच्या दिवशी वातानुकूलित लोकलच्या १४ फेऱ्या धावतात.

Leave a Reply

Your email address will not be published.