Uncategorized

चेतन सिंहला ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई दि.०८ :- जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये चार प्रवाशांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या करणारा आरोपी चेतन सिंहला ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये ३१ जुलै रोजी तीन मुस्लिम प्रवासी आणि एका आरपीएफ अधिकाऱ्यावर चेतन सिंहने गोळीबार केला होता.

राज्यातील आर्थिक गैरव्यवहाराची प्रकरणे आता सीबीआय विशेष न्यायालयांमध्ये

अटक करण्यात आलेल्या चेतन सिंहला न्यायालयाने ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनाविली होती. मात्र चेतनने आजारपणाचे कारण देत पोलीस तपासाला सहकार्य केले नाही. चौकशी करताना तो शांत बसतो किंवा अस्पष्ट बोलतो. त्यामुळे पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *