मुंबईकर आणि ठाणेकरांना शून्य सावलीचा अनुभव घेता येणार
मुंबई दि.१२ :- मुंबईकर आणि ठाणेकरांना अनुक्रमे येत्या १५ आणि १६ मे रोजी शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे. या दिवशी सूर्य बरोबर डोक्यावर येईल तेव्हा भर दुपारी आपली सावली गायब झाल्याचा अनुभव घेता येणार आहे.
‘शासन आपल्या दारी’ राज्यस्तरीय अभियानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या शुभारंभ
पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमशः उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो. पण या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवयाला मिळतो.
‘आभा’ प्रणालीमुळे रुग्णाची आरोग्यविषयक माहिती सहज उपलब्ध होणार
जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो, तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू ती सावली गायब होते. शून्य सावलीचा हा अनुभव मुंबईकरांना येत्या १५ हे रोजी तर ठाणेकर, कल्याणकरांना येत्या १६ मे रोजी घेता येणार आहे.