स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर हिंदी वेबसीरिज ‘वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’
मुंबई दि.१९ :- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर ‘वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’ ही हिंदी वेबसीरिज तयार करण्यात येणार आहे. वेबसीरिजच्या चित्रीकरणाची सुरुवात नुकतीच भोर येथील राजवाड्यात करण्यात आली. वेबसीरिजचे लेखक, दिग्दर्शक योगेश सोमण, निर्माते आणि डेक्कन ग्रुपचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. अनिर्बान सरकार, सिनेमॅटोग्राफर प्रसाद भेंडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे गटातील माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
‘वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’ वेबसीरिजच्या माध्यमातून इतिहासाला अवगत असणारे, ज्याचे पुरावे उपलब्ध आहेत त्या आधारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्व मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे योगेश सोमण यांनी सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी संपूर्ण कुटुंबासहित आपले सर्व आयुष्य देशकार्यासाठी अर्पण केले. त्यांचे कार्य समाजासमोर आले पाहिजे. सावरकर यांच्या जीवनापासून लोकांनी प्रेरणा घ्यावी, सावरकर यांच्याबाबत असलेले गैरसमज दूर व्हावे यासाठी वेबसीरिजची निर्मिती करण्यात येत आहे, असेही सोमण म्हणाले.
नवी मुंबईत आता दिवसातून एकदाच सलग सहा ते सात तास पाणीपुरवठा
ही वेबसीरिज चार सीझनमध्ये असून पहिल्या सिझनमध्ये सावरकर यांच्या जन्मापासून म्हणजे १८८३ ते मार्सेलिस येथील समुद्रातील उडी हा कालखंड पाहता येणार असल्याची माहितीही सोमण यांनी दिली. डॉ. अनिर्बान सरकार म्हणाले, सावरकर यांचे जीवनकार्य संपूर्ण देशाला माहिती व्हावे यासाठी ही वेबसिरीज हिंदी भाषेत तयार करत आहोत. सावरकर यांच्या जीवनावर आधारित कलाकृती सादर करावी हे माझे स्वप्न होते, ते या वेबसीरिजच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे.