किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह चित्रफीतीची चौकशी व्हावी- अंबादास दानवे – सभापतींकडे पेनड्राइव्ह सादर
मुंबई , दि. १८
माजी खासदार किरीट सोमय्या यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ असलेला पेनड्राइव्ह विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधानपरिषद सभागृहात सभापतींकडे सादर केला.तसेच याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी दानवे यांनी सभागृहात लावून धरली.
महामंडळांवर विविध पदांचे प्रलोभन दाखवून, ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांची भीती दाखवून, काही महिला अधिकाऱ्यांना धमकी देऊन त्यांची पिळवणूक व शोषण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी सोमय्या यांच्यावर केला.
या पेनड्राइव्हमध्ये स्त्रियांविषयी अश्लील संभाषण असून त्याचाही तपास करावा. मराठी महिलांविषयी अशा शब्दांत संभाषण करणारे किरीट सोमय्या हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रद्रोही आहेत, अशी टीका दानवे यांनी केली.
या गंभीर प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
———–
