केंद्रातील भाजप सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी पी. चिदंम्बरम
मुंबई दि.२९ :- केंद्रातील भाजप सरकारने नऊ वर्ष पूर्ण केली असून या नऊ वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी आज येथे केली. मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने काँग्रेसतर्फे देशभरातील प्रमुख शहरात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार युवा पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली जबाबदारी – रवींद्र चव्हाण
टिळकभवन, दादर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत चिदंबरम बोलत होते. देशाचा कारभार राज्यघटनेनुसार चालतो की नाही अशी चिंता निर्माण झाली आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यातील दरी वाढत असून राज्य सरकारांच्या कार्यकारी अधिकारांमध्ये कपात करण्यात आली आहे.
संसदीय नियम आणि कायद्यांचे उल्लंघन केले जात आहे. खोट्या केसेस, तपासाच्या धमक्या देऊन राज्य सरकारांना अस्थिर करण्यासाठी केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत, असेही चिदंबरम म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
