अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या महापालिका अधिका-याला मारहाण

देवनार पोलिसांकडून मारहाण करणा-या महिलेला अटक

मुंबई दि.२१ :- गोवंडी येथे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या बृहन्मुंबई महापालिका अधिकाऱ्याला एका महिलेने मारहाण केली. याप्रकरणी देवनार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला अटक केली आहे. महापालिकेच्या एम-पूर्व विभाग कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी कृष्णा म्हापणकर (४९) उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चेंबूरच्या वाशी नाका परिसरातील सदनिका तोडण्यासाठी सहकारी आणि तक्रारदाराबरोबर जात होते.

शिवसेनेतर्फे ‘१० वी, १२ वी नंतर काय?’ या विषयावर २३ एप्रिलरोजी व्याख्यान

त्यावेळी फातिमा शकील शेख (३६) हिने त्यांना अडवले. तसेच तेथे उपस्थित आरोपी महिला रुबिना शेखने (२३) भ्रमणध्वनीमधील काही कागदपत्रे त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला.

देवनार पशुवधगृह येथे ३०० सीसीटीव्‍ही बसविणार

म्हापणकर यांनी तिला याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्याची सूचना केली. त्यावेळी आरोपी रुबिनाने म्हापणकर यांच्या कानाखाली मारली. याप्रकरणी म्हापणकर यांच्या तक्रारीवरून देवनार पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *