देवनार पशुवधगृह येथे ३०० सीसीटीव्ही बसविणार
मुंबई दि.२१ :- येत्या जून महिन्यात येणा-या बकरी ईदच्या निमित्ताने यंदा देवनार पशुवधगृह परिसरात साधारणपणे ३०० ‘क्लोज सर्किट टेलीव्हिजन कॅमेरे’ (सीसीटीव्ही) कॅमेरे लावण्यात येणार आहेत, अशी माहिती देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डाॅ. कलीमपाशा पठाण यांनी दिली.
उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन राज्य मंडळाच्या शाळांना आजपासून सुट्टी
बकरी ईद सणाच्या साधारणपणे १० ते १५ दिवस आधी विक्रेते देवनार पशुवधगृहात दोन ते अडीच लाख बकरे, १२ ते १५ हजार म्हैसवर्गीय जनावरांसह दाखल होतात. या दिवसात येथे ग्राहकही मोठ्या संख्येत येतात. त्यामुळे सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.
शिवसेनेतर्फे ‘१० वी, १२ वी नंतर काय?’ या विषयावर २३ एप्रिलरोजी व्याख्यान
सीसीटीव्ही कॅमे-यांसह पशुवधगृहात लावण्यात येणारी अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्याची कार्यवाही बृहन्मुंबई महापालिकेच्या यांत्रिकी व विद्युत विभागाद्वारे करण्यात येणार आहे. यात पॅन – टिल्ट – झूम (पीटीझेड) ची सुविधा असणारे १२ टेहाळणी कॅमेरे, २ व्हिडिओ वॉल, ५ एलईडी स्क्रीनही बसविण्यात येणार आहेत, असे यांत्रिकी व विद्युत विभागाचे प्रमुख अभियंता कृष्णा पेरेकर यांनी सांगितले.