‘ द रॅशनलिस्ट मर्डर्स’ पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन
मुंबई दि.०१ :- डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चार जणांची हत्या झाल्यानंतर या चारही प्रकरणात तपास यंत्रणांनी ज्या प्रकारे तपास केला त्यात कुठेही ताळमेळ आणि तर्क दिसला नाही. उलट हा तपास भरकटला होता, असे प्रतिपादन डॉ. अमित थडानी यांनी केले. डॉ. अमित थडानी यांनी लिहिलेल्या ‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत झाले. इतिहासतज्ञ, लेखक रतन शारदा, अभिनेत्री केतकी चितळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मरीन ड्राईव्ह परिसरात पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा द्याव्यात- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ हे पुस्तक लिहिण्यासाठी शेकडो संदर्भ पडताळले आणि दहा हजारांहून अधिक पानांची आरोपपत्रे वाचली. एकंदरीत तपासातील अनेक त्रुटी, गरीब आणि सामान्य घरातील युवकांना गोवण्याचे षडयंत्र तसेच विरोधी विचारसरणी असणाऱ्या संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला, असे डॉ. थडाणी म्हणाले. हिंदू आणि हिंदुत्व यांवर कोणत्याही पुराव्याविना आरोप करण्यात आले. ‘भगवा आतंकवाद’ म्हणून हिंदूंना लक्ष्य केले जाते. हिंदूच विवेकवादी आहेत. ते चर्चेसाठी नेहमीच सिद्ध असतात; परंतु काही गुन्ह्यांमध्ये हिंदूंना अडकवून हिंदुत्वाची बदनामी करण्याचे षड्यंत्र काहींकडून सुरू आहे, असे रतन शारदा यांनी सांगितले.
ई शिवनेरी बसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन
हत्यांच्या तपासात बऱ्याच चुकीच्या बाबी तपासयंत्रणाकडून झाल्या आहेत हे मांडले आहे, त्यावर प्रश्न विचारण्याची हिंमत या पुस्तकाच्या लेखकांनी दाखविलीआहे, गुजरात दंगली, मालेगाव स्फोट खटला, भीमा कोरेगाव प्रकरणातील स्टॅन स्वामी अशा अनेक प्रकरणांत प्रश्न विचारले जावेत, असे ॲड. विरेंद्र इचलकरंजीकर यांनी सांगितले. तर ज्यांना सत्य जाणून घ्यायचे आहे त्यांनी डॉ. थडानी यांचे पुस्तक वाचावे, असे केतकी चितळे म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिप्तेश पाटील, ॲड. खुश खंडेलवाल यांनी केले. डॉ. अंजना थडानी यांनी आभार मानले.