नितीन चंद्रकांत देसाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
मुंबई दि.०४ :- कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी कर्जत येथील एनडी स्टुडिओत अंत्यसंस्कार करण्यात आले. देसाई यांनी याच स्टुडिओत गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
ठाण्यात राज्यातील पहिले अवयवदान जनजागृती उद्यान अवयव दान ही काळाची गरज- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, रवी जाधव, अभिनेते आमीर खान आणि हिंदी, मराठी चित्रपट, मालिका सृष्टीतील मंडळी यावेळी उपस्थित होती.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कलादिग्दर्शक देसाई यांच्या पार्थिवाचे मुंबईत जे.जे. रुग्णालयात अंत्यदर्शन घेतले.