महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मनात शाहीर साबळे यांचे स्थान अढळ- शरद पवार
मुंबई दि.२६ :- गाण्याच्या माध्यमातून लोकांना वैचारिक दिशा देण्याचे कार्य शाहीर साबळे यांनी आयुष्यभर केले. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मनात त्यांचे स्थान अढळ आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले.
पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्याला यलो ॲलर्ट जारी
शाहीर साबळे यांनी गायलेल्या, राजा बढे यांनी लिहिलेल्या आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गाण्याची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. या गाण्याच्या प्रकाशनसमारंभात ते बोलत होते.
मॉरिशसमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
शाहीर साबळे यांनी गायलेले ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत राज्यगीत म्हणून घोषित झाले असून एका दृष्टीने हा शाहिरांचा गौरवच आहे, असेही पवार म्हणाले. केदार शिंदे यांनी मराठीतील १८ कलाकारांचा सहभाग असलेल्या या गाण्याची निर्मिती केली आहे.