पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्याला यलो ॲलर्ट जारी

मुंबई दि.२६ :- राज्यात विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून मुंबईसह कोकण, उत्तर महाराष्ट्र, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच येत्या २८ एप्रिलपर्यंत देशाच्या पूर्व भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मॉरिशसमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण

पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्येही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी जोरदार वारे वाहून पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

आयसीसी जागतिक चषक सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर

धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या भागात सुद्धा जोरदार वारे वाहण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून मराठवाड्यासह विदर्भातही गारपीट होण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस राज्यात कोणत्याही भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.