* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते विविध दाखल्यांचे वितरण – मुंबई आसपास मराठी
ठळक बातम्या

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते विविध दाखल्यांचे वितरण

मुंबई दि.२६ :- मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांचे वितरण शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांची कामे प्रलंबित ठेऊ नका, असे आदेश केसरकर यांनी प्रशासनाला दिले.

मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी मार्गावर पुढील महिन्यात चाचण्या सुरू

‘जनतेशी सुसंवाद’ या कार्यक्रमांतर्गत केसरकर दर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. काल झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

गिरगाव येथील अभ्यासिकेचे उदघाटन

केसरकर यांच्या हस्ते जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, मिळकत प्रमाणपत्र आदींचे वितरण करण्यात आले. तसेच उपस्थित नागरिकांचे संजय गांधी निराधार योजना, अंत्योदय योजना आदी योजनांमधून लाभ मिळावा यासाठी अर्ज स्वीकारण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *