डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महापालिका सेवा – सुविधांसह सज्ज
चैत्यभूमी परिसरात सुशोभीकरण, अनुयायांसाठी व्यवस्था
समाजमाध्यमांवर थेट प्रक्षेपण, लेजर शो,छायाचित्र प्रदर्शन
मुंबई दि.१३ :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्ताने चैत्यभूमीवर आंबेडकर अनुयायी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात. या अनुयायांसाठी बृहन्मुंबई महापालिकेने विविध नागरी सेवा – सुविधा पुरविण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर ) आशीष शर्मा यांनी आज चैत्यभूमीला भेट देऊन सोयी सुविधांची पाहणी केली. महापालिका ‘परिमंडळ २’ चे उपआयुक्त रमाकांत बिरादार, ‘जी उत्तर’ विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळ, मुंबई पोलीस परिमंडळ ५ चे उपआयुक्त मनोज पाटील, सहाय्यक आयुक्त अविनाश कानडे यावेळी उपस्थित होते.
ऐनवेळी विमान रद्द झाल्याने प्रवासी संतप्त, विमानतळावर गोंधळ
जयंती दिनानिमित्त नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. चैत्यभूमी परिसरात पाच एलईडी स्क्रिनद्वारे चैत्यभूमीच्या आतील अभिवादनाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
Dombiavli ; पत्रकाराला लागला डान्सबारचा नाद, घरफोडी प्रकरणात पत्रकार रोशन जाधवला अटक
यंदा पहिल्यांदाच अनुयायांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित एका विशेष लेझर शो चे आयोजन माता रमाबाई व्ह्युईंग डेक येथे १४ एप्रिल रोजी सायंकाळी करण्यात आले आहे. महापालिका जनसंपर्क विभागामार्फत चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत छायाचित्रांचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. महानगरपालिका संगीत कला अकादमीतर्फे गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुंबई पोलीस दलाच्या बॅंड पथकाद्वारे मानवंदना देण्यात येणार आहे.