सावरकरविरोधातील काँग्रेसच्या अपप्रचाराला पुराव्यानिशी चोख प्रत्युत्तर देणारे पुस्तक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
मुंबई दि.२२ :- स्वातंत्र्यवीर सावरकरांमुळे देशाची फाळणी झाल्याचा अपप्रचार काँग्रेसकडून वारंवार केला जातो. त्या अपप्रचाराला हे पुस्तक म्हणजे पुराव्यानिशी दिलेले चोख प्रत्युत्तर आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर अनुवादित ‘वीर सावरकर- फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सावरकर सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते.
मोडी लिपी प्रसार समिती आणि सावरकर स्मारकातर्फे मोडी लिपी स्पर्धा
सावरकरांची देशभक्ती, त्याग, त्यांचे कार्य शब्दांत मांडणे कठीण आहे. त्यांचे वर्णन शब्दांच्या पलीकडचे आहे. त्यामुळे नव्या पिढीला सावरकर समजून घ्यायचे असतील, तर हे पुस्तक प्रत्येकाने वाचायला हवे, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, काही लोक इतिहास घडवितात, काही लोक पळवितात. काँग्रेसने या देशाचा इतिहास पळविला आणि आपल्याला हवा तसा लिहून घेतला. त्यांनी नागरिकांना इतिहासाची एकच बाजू दाखवली, भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार, शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, आमदार अतुल भातखळकर, केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर, लेखक उदय निरगुडकर आदी यावेळी उपस्थित होते.
पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी पाठपुरावा करावा – मुख्यमंत्री शिंदे
रणजित सावरकर, उदय निरगुडकर, अतुल भातखळकर, आशिष शेलार, उदय माहुरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सहकार्यवाह स्वप्निल सावरकर यांनी सूत्रसंचालन केले.
खारघर दूर्घटना प्रकरणी राज्यातील सर्व जिल्ह्यात काँग्रेसच्या पत्रकार परिषद- अतुल लोंढे
‘वीर सावरकर- फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सावरकर सभागृहात करण्यात आले. त्यावेळी डावीकडून माननीय सदा सरवणकर, नितेश राणे, राहुल शेवाळे, अतुल भातखळकर केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डॉ. उदय निरगुडकर, सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि आशिष शेलार.