ठळक बातम्या

मोडी लिपी प्रसार समिती आणि सावरकर स्मारकातर्फे मोडी लिपी स्पर्धा

मुंबई दि.२२ :- स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि जागतिक मोडी लिपी प्रसार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १ मे रोजी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, अहमदनगर आणि कोल्हापूर या चार शहरांमध्ये एकाचवेळी आणि एकाच दिवशी सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा  आणि मोडी लिप्यंतर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मोडी लिपिच्या प्रचारासाठी घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेचे हे सातवे वर्ष आहे. स्पर्धेसाठी शनिवार २९ एप्रिल २०२३ पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाचा निर्धार सर्वोच्च न्यायालयासमोर क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार
यावेळी काही तांत्रिक कारणामुळे  नाशिक केंद्र समाविष्ट केले गेलेले नाही.  नाशिकमधील मोडी लिपी अभ्यासक मुंबई, पुणे किंवा नगर येथील केंद्रावर स्पर्धेसाठी सहभागी होऊ शकतात. प्रवेशपत्रे ही संबंधित केंद्रावरच भरावयाची असून ऑनलाईन प्रवेशपत्र भरण्याची मुभा देण्यात आलेली नाही. दूर अंतरावर रहाणारे स्पर्धेच्याच दिवशी अर्धा तास आधी प्रवेश शकतील, पुस्तक विक्रेत्यांनाही मोडीविषयक पुस्तकांचे स्टॉल या ठिकाणी लावण्यास आवाहन करण्यात आले आहे.

खारघर दूर्घटना प्रकरणी राज्यातील सर्व जिल्ह्यात काँग्रेसच्या पत्रकार परिषद- अतुल लोंढे

या स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्यांनी स्पर्धकांनी स्वतःचे पेन, बोरू, टाक, पेन्सिल, खोडरबर, फूट पट्टी आणि धरावयास पॅड स्वत: आणावे. स्पर्धकांना कागद पुरवले जातील, काळया शाईचा वापर अनिवार्य आहे. सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धेकरिता देवनागरी लिपीत उतारा दिला जाईल तो मोडी लिपीत लिहावयाचा आहे. अक्षर चुका ग्राह्य धरल्या जातील. शीघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धेकरिता एक पेशवेकालीन कागद असेल आणि त्यासाठी एक तास दिला जाईल. पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिके दिली जातील. स्पर्धा निकाल प्रक्रियेचे सर्व हक्क आयोजकांकडे राहतील.

पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी पाठपुरावा करावा – मुख्यमंत्री शिंदे

अधिक माहितीसाठी संपर्क :-

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, वीर सावरकर मार्ग, दादर, शिवाजी पार्क मुंबई ४०००२८ संपर्क सुनील कदम – ९८६९२२०२२३ / ०२२-२४४६५८७७, पुणे येथे संपर्क – संदीप कान्हेरे – ९८९०६००७०८, अहमदनगर ऐतिहासिक संग्रहालय, अहमदनगर , संपर्क- संतोष यादव – ९३७२१५५४५५,कोल्हापूर येथील संपर्कासाठी (कोल्हापूर – नाईट कॉलेज) नवीनकुमार माळी – ९४२००३९४९४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *