पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी पाठपुरावा करावा – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई दि.२१ :- पायाभूत सुविधा प्रकल्प राज्याच्या तसेच मुंबई महानगर प्रदेशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याबाबत सर्वच यंत्रणांनी पुढाकार घेऊन भूसंपादन व अन्य कार्यवाही तातडीने पूर्ण करावी आणि हे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी पाठपुरावा करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल येथे दिले.

खारघर दूर्घटना प्रकरणी राज्यातील सर्व जिल्ह्यात काँग्रेसच्या पत्रकार परिषद- अतुल लोंढे

मुख्यमंत्री शिंदे यांनी वॉर रूममध्ये प्रकल्पांचा आढावा घेतला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री वॉर रूमचे महासंचालक राधेश्याम मोपलवा, विविध विभागांचे सचिव, मुंबई महापालिका, एमएमआरडीए, सिडको, महावितरण, मुंबई मेट्रो प्रकल्पासह, ठाणे, रायगडचे जिल्हाधिकारी तसेच रेल्वे आदी यंत्रणांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाचा निर्धार सर्वोच्च न्यायालयासमोर क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार

पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत मार्गी लागावेत यासाठी योग्य समन्वय राखा, त्यासाठी कालबद्ध नियोजन करा असा सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. बैठकीत वांद्रे शासकीय वसाहतीचा पुनर्विकास, सिडकोचे कोंढाणे धरण, खारघर-बेलापूर-नेरुळ किनारा रस्ता प्रकल्प, उलवे किनारा रस्ता प्रकल्प, रोहा दिघी रेल्वेमार्ग, कुडूस-आरे उच्चदाब वीज वाहिनी उभारणी, मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प, वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्प, म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनांचा आढावा घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.