उबाठा गटाच्या युवासेनेचे राहुल कनाल यांचा उद्या शिवसेनेत प्रवेश?
मुंबई, दि. ३०
उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि उबाठा गटाच्या युवासेनेचे नेते राहुल कनाल उद्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येते. युवासेनेतील अंतर्गत राजकारणामुळे कनाल नाराज असल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत राहुल कनाल शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत.
शिवसेना पक्षाचे नेते नरेश म्हस्के यांनी अलीकडेच एक ट्विट केले होते. उबाठा गटाला लवकरच आणखी एक धक्का बसणार असल्याचे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले होते.
———-
