कामगारांच्या हितासाठी कंत्राटी कामगार कायद्याची पुनर्रचना करावी – भारतीय मजदूर संघाची मागणी
मुंबई दि.१० :- कंत्राटी कामगारपध्दतीबाबत सरकार आणि प्रशासनाचा मनमानी कारभार बंद करून कामगारांच्या हितासाठी कंत्राटी कामगार कायद्याची पुनर्रचना करावी, असा ठराव भारतीय मजदूर संघाच्या पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात मंजूर करण्यात आला.
रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी ३३ प्रवाशांचे प्राण वाचविले
संघटीत, असंघीटत कामगारांना न्याय मागण्यांसाठी देशभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर आंदोलने, धरणे आंदोलन केले जावे. याची प्रत जिल्हाधिका-यांच्याद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवावी, असे आवाहन भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय संघटनमंत्री श्री बी सुरेंद्रन यांनी यावेळी केले.
राज्यात कौशल्य क्रांती आणण्यासाठी कौशल्य विद्यापीठाची भूमिका महत्वाची- राज्यपाल बैस
भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हिरण्यमय पंड्या, महामंत्री रविंद्र हिमते यावेळी उपस्थित होते. सर्व कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळावी, आर्थिक विकासासाठी ‘श्रम निती’ तयार केली जावी, किमान वेतनाच्या ऐवजी ‘लिव्हींग वेज’ मिळावे हे ठरावही या अधिवेशनात मंजूर करण्यात आले.
सीप्झ-कुलाबादरम्यानच्या मेट्रोवरील २१ स्थानकांचे काम ९० टक्के पूर्ण
महाराष्ट्र राज्यातही सर्वत्र आंदोलना करून जनजागृती करण्यात येणार आहे, असे भामसंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल ढुमणे यांनी सांगितले. या आंदोलनात महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांनी एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवहान महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले आहे.