रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी ३३ प्रवाशांचे प्राण वाचविले
मुंबई दि.१० :- ‘मिशन जीवन रक्षक’अंतर्गत मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये मुंबई विभागात वाचवले असून ३३ प्रवाशांचे प्राण वाचविले आहेत.
राज्यात कौशल्य क्रांती आणण्यासाठी कौशल्य विद्यापीठाची भूमिका महत्वाची- राज्यपाल बैस
जीव धोक्यात घालून धावत्या लोकल, मेल-एक्सप्रेसमध्ये चढताना किंवा उतरताना प्रवाशांचा अंदाज चुकून तोल जातो. कर्तव्यावरील रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांकडून प्रवाशांचे प्राण वाचविण्यात आले आहेत.
सीप्झ-कुलाबादरम्यानच्या मेट्रोवरील २१ स्थानकांचे काम ९० टक्के पूर्ण
काही प्रसंगात रेल्वे सुरक्षा जवानांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवाशांचे प्राण वाचविले आहेत. दरम्यान, धावत्या रेल्वेत चढून किंवा उतरून प्रवाशांनी जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.