आशा भोसले यांना ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ प्रदान
मुंबई दि.२५ :- ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८१ व्या पुण्यतिथिनिमित्त मुंबईत दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आशा भोसले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह आणि एक लाख एक हजार एक रोख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारासह अन्य अन्य दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांचेही यावेळी वितरण करण्यात आले.
कोंढवा येथील शाळेत दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण केंद्र ही गंभीर बाब- डॉ. रिंकू वढेरा
पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा हे यावेळी उपस्थित होते. हाजी अली येथे लता मंगेशकर यांचे ४० फूट स्मारक उभारणार येणार आहे, अशी घोषणा लोढा यांनी केली. यावर्षी भारतीय संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल पंकज उधास यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट नाटक व उत्कृष्ट नाटय़निर्मितीचा पुरस्कार ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या गौरी थिएटर्स या संस्थेला, समाजसेवेच्या क्षेत्रात समर्पित सेवेसाठी श्री सदगुरु सेवा ट्रस्ट, साहित्य क्षेत्रासाठी ग्रंथाली प्रकाशनाला वागविलासिनी पुरस्कार, नाटक आणि चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रसाद ओक आणि चित्रपट क्षेत्रासाठी विद्या बालन यांना प्रदान करण्यात आला.
मेट्रो ३ मार्गिकेच्या कामासाठी आरे वसाहतीतील १७७ झाडे पोलीस बंदोबस्तात तोडली
‘एमआयटी’ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनाही सन्मानित करण्यात आले. राजबाग, लोणी येथे विश्वनाथ कराड यांनी विश्वशांती कला अकादमी स्थापन केली. या अकादमीचे अध्यक्षपद गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सांभाळले होते. लता मंगेशकर यांच्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीला मानवंदना देण्यासाठी कराड यांनी उत्तराखंड येथे सरस्वती नदीच्या उगमस्थानी सरस्वतीचे मंदिर बांधून मूर्तीसमोर लता मंगेशकर यांचा पुतळा उभारला आहे. शास्त्रीय संगीत गायक राहुल देशपांडे, गायक हरिहरन यांच्या गाण्यांची मैफल रंगली. आसाम येथील कलाकारांचे कथ्थक नृत्यविष्कार सादर केला.