ठळक बातम्या

सहकारी गृहनिर्माण संस्थांना आकारण्यात येणारा अकृषिक कर रद्द होण्याची शक्यता

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आश्वासन

मुंबई दि.२४ :- राज्य सरकारकडून सहकारी गृहनिर्माण संस्थांना आकारण्यात येणारा एन. ए. टॅक्स (अकृषिक कर) लवकरच रद्द केला जाण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहे. आमदार आणि अनेक गृहनिर्माण संस्थांनी एन. ए. टॅक्स (अकृषिक कर) रद्द करण्याची मागणी केली होती.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानावरून विधानसभेत गोंधळ, कामकाज काही वेळासाठी तहकूब

अकृषिक कर रद्द करण्याच्या मागणीवर सध्या विचार सुरु असून महसूल खात्याने यासंदर्भात या क्षेत्रातील व्यक्तींशी बोलून अहवाल तयार केला आहे. त्यामुळे आम्ही यासंदर्भात लवकरच अंतिम निर्णय घेऊ, असेही विखे-पाटील यांनी सांगितले.

पालकांना महागाईचा आणखी एक झटका, शालेय बस शुल्क येत्या १ एप्रिलपासून वाढणार

शहरांमध्ये गावठाणाच्या परिसरात न येणाऱ्या महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील गृहनिर्माण संस्थांकडून एन. ए. टॅक्सची (अकृषिक कर) आकारणी केली जाते. गेल्या काही दिवसांत एन. ए. टॅक्स वसुली सुरू असल्याने आणि त्या अंतर्गत विविध व्यक्ती, सहकारी संस्था यांना दंड आणि व्याजासहित थकीत कराचा भरणा करण्याच्या नोटिसा पाठविण्यात आल्याने हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *