कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी महामंडळाचा स्टाॅल
मुंबई दि.१७ :- फ्रान्स येथे कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. या महोत्सवाच्या बाजार विभागात महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचा आकर्षक स्टाॅल उभारण्यात आला आहे. या स्टाॅलला केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरगन यांनी भेट दिली. चित्रपटासंदर्भात महामंडळ राबवित असलेली योजना, महामंडळतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम अशी माहितीपूर्ण-आकर्षक डिझाईन केलेल्या स्टाॅलची मुरगन यांनी पाहणी केली.
तसेच महाराष्ट्र शासन चित्रपटाबाबत राबवत असलेल्या विविध योजना, उपक्रमांची माहितीही त्यांनी जाणून घेतली. त्याचबरोबर बाजार विभागासाठी पाठविण्यात आलेल्या चित्रपटांनां त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी जेष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणे, महामंडळाचे वित्तीय सल्लागार वित्तधिकारी, राजीव राठोड, चित्रपटांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मराठी चित्रपटांनां आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळावे यासाठी महामंडळामार्फत २०१६ पासून या महोत्सवात सहभाग घेतला जात आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देशभरातील शाखांमध्ये सायबर फसवणुकीच्या प्रकारांत वाढ
यंदा महोत्सवाच्या बाजार विभागासाठी संदीप सावंत दिग्दर्शित “या गोष्टीला नावच नाही”, सचिन मुल्लेमवार दिग्दर्शित “टेरिटेरी” आणि मंगेश बदर दिग्दर्शित “मदार” सिनेमांची निवड करण्यात आली. या तिन्ही चित्रपटांचे प्रतिनिधी कान येथे उपस्थित आहेत. निवडलेला चित्रपटांनां जागतिक बाजारपेठ मिळावी, चित्रपटांचे वितरण व्हावे यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी महामंडळाच्या स्टाॅलला भेट दिली.