मराठी संत परंपरेतून देशाला समानता आणि भक्तीचा संदेश- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
मुंबई, दि. ७
महाराष्ट्रातील मराठी संत परंपरेतून देशाला समानता आणि भक्तीचा संदेश मिळाला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी मुंबईत केले.
राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर पहिल्यांदाच आलेल्या द्रौपदी मुर्मू यांचा राज्य शासनातर्फे राजभवन येथे नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यावेळी उपस्थित होते.
आत्मसन्मान आणि राष्ट्राचा गौरव वाढविणारे छत्रपती शिवाजी महाराज, समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या समाजसुधारकांची भूमी असलेले महाराष्ट्र हे खरोखरच महान राज्य आहे, असेही राष्ट्रपती म्हणाल्या. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.
—-