महापालिकेच्या दहा प्रभागात ज्येष्ठ नागरिकांसाठी काळजी केंद्रे
मुंबई, दि. ७
मुंबई शहर जिल्ह्यात महापालिकेच्या दहा प्रभागांत ज्येष्ठ नागरिकांसाठी काळजी केंद्रे (डे केअर) सुरू करण्यात येणार आहेत.
या केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना सोपे जावे यासाठी १० विद्युत बससाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे.
या ज्येष्ठ नागरिक काळजी केंद्रात माध्यान्ह भोजनही देण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई शहर पालकमंत्री दिपक केसरकर यांनी दिली.
शहर जिल्हा नियोजन मंडळाच्या झालेल्या बैठकीनंतर केसरकर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
—–
