धर्म संस्कृती

महात्मा फुले वाड्या’तील वटपूजनावर लादलेली बंदी मागे; हिंदु जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या लढ्याला मोठे यश!

बंदी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार ? – रमेश शिंदे

पुणे: येथील ऐतिहासिक ‘महात्मा फुले वाडा’ परिसरातील वटवृक्षाच्या पूजनावर पुरातत्व विभागाने घातलेली बंदी अखेर प्रशासनाने मागे घेतली आहे. हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केलेल्या तीव्र विरोधानंतर प्रशासनाला हा निर्णय बदलावा लागला आहे.

पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे साहाय्यक संचालक डॉ. विलास वाहने यांनी खडक पोलीस ठाण्याला पत्र पाठवून, वाडा परिसर राज्य संरक्षित घोषित होण्यापूर्वीपासून चालत आलेल्या धार्मिक परंपरा व चालीरीती यांची सद्यःस्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्याची सूचना केली आहे.

मुंबई लोकल बनली धर्मांतर आणि भोंदूगिरीचा अड्डा; मुख्य सूत्रधारांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा जनआंदोलन! – हिंदु जनजागृती समितीचा रेल्वे प्रशासनाला थेट इशारा

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पुण्यातील महात्मा फुले वाडा परिसरात दरवर्षी स्थानिक महिला पारंपारिक पद्धतीने वटपौर्णिमेला वटवृक्षाचे पूजन करतात. मात्र, यंदा पुरातत्व विभागाने या पूजनावर बंदी घालणारा आदेश जारी केला होता. या आदेशामुळे स्थानिक नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता.

या बंदीविरोधात हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती, हिंदु राष्ट्र समन्वय समिती, सुराज्य अभियान आणि रणरागिणी शाखा यांच्या शिष्टमंडळाने पुरातत्त्व विभाग, पोलीस प्रशासन आणि पुणे महानगरपालिका आयुक्तांना निवेदने दिली होती. हा निर्णय हिंदू महिलांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर आणि संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांवर आघात असल्याचा आरोप संघटनांनी केला होता. तसेच वकिलांमार्फत कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आली होती.

भागवत धर्माची पताका सातासमुद्रापार! ११ देशांतून १७,४०० किमीचा प्रवास करत निघाली ‘लंडन ते पंढरपूर ग्लोबल वारी’

‘तुघलकी आदेश काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा’ – रमेश शिंदे

प्रशासनाने बंदी मागे घेतल्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले:

“परंपरेने चालत आलेले पूजन बंद करण्याचा पुरातत्व खात्याचा आदेश अत्यंत तुघलकी होता. आमच्या तीव्र विरोधानंतर आणि कायदेशीर नोटीसनंतर प्रशासनाला भारतात धर्मस्वातंत्र्य असल्याची जाणीव झाली असून त्यांनी हा निर्णय मागे घेतला आहे. आम्ही फडणवीस सरकारचे अभिनंदन करतो; मात्र हिंदूंना विनाकारण त्रास देणाऱ्या आणि हेतूपूर्वक खोडा घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर सरकारने तात्काळ कडक कारवाई करावी.”

मुंबई लोकल बनली धर्मांतर आणि भोंदूगिरीचा अड्डा; मुख्य सूत्रधारांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा जनआंदोलन! – हिंदु जनजागृती समितीचा रेल्वे प्रशासनाला थेट इशारा

महिलांना पूजनाचे आवाहन

या यशानंतर समितीचे श्री. रमेश शिंदे यांनी परिसरातील सर्व हिंदू महिलांना आवाहन केले आहे की, त्यांनी वटपौर्णिमेच्या दिवशी मोठ्या संख्येने ‘महात्मा फुले वाडा’ येथे एकत्र येऊन उत्साहात वटवृक्षाचे पूजन करावे आणि आपली धार्मिक परंपरा टिकवून या विजयाचा आनंद साजरा करावा.