दैनिक ‘जनमत’चा ३५ वा वर्धापनदिन सोहळा; बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या स्मृतींना उजाळा मिळणार
कल्याण:
दैनिक ‘जनमत‘च्या ३५ व्या वर्धापनदिनानिमित्त आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून कल्याणमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आठवणीतले बाळासाहेब आणि आनंद दिघे’ या विषयावर आधारित या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर दिग्गज आपले विचार मांडणार आहेत.
हा सोहळा रविवार, १० मे रोजी सकाळी ११ वाजता कल्याण (पश्चिम) येथील आचार्य अत्रे नाट्यगृह, कॉन्फरन्स हॉल मध्ये पार पडणार आहे.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण:
या विशेष दिनी दैनिक जनमतच्या ३५ व्या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच, पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांचा विशेष गौरव देखील या सोहळ्यात केला जाणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून ॲड. हर्षाली चौधरी: महापौर, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, डॉ. सुकृत खांडेकर: ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक (ज्यांनी ‘शिवसेना आणि सामना’ विषयावर पी.एच.डी. केली आहे), कुमार कदम: माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, गोपाळ लांडगे शिवसेना जिल्हाप्रमुख, दिनेश देशमुख अध्यक्ष, ठाणे जिल्हा हिंदू मंच.,डॉ. चंद्रशेखर तांबडे भाजपा राज्यपरिषद सदस्य व संचालक, दि कल्याण जनता सहकारी बँक, तुषार राजे ज्येष्ठ पत्रकार उपस्थित राहणार आहेत:
हे सर्व मान्यवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्यासोबतच्या आपल्या आठवणींना उजाळा देणार आहेत. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन व्यवस्थापक आणि कार्यकारी संपादक तेजस राजे यांनी केले आहे.
