अंधेरी येथील महाकाली मार्गावर दरड कोसळली; १६८ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले
मुंबई दि.२५ :- अंधेरी पूर्व येथील महाकाली मार्गावर सोमवारी मध्यरात्री दरड कोसळली. एका सात मजली इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगरावरील माती वेगाने खाली आली. यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून इमारतीतील १६८ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
दहिसर ते मिरारोड मेट्रो ९’ मार्गिकेच्या कारशेडसाठी उत्तन येथे जागा
महाकाली मार्गावर गुरुनानक शाळेजवळ असलेल्या सात मजली ‘रामबाग’ गृहनिर्माण सोसायटीच्या मागील डोंगरावरची माती मध्यरात्री दीडच्या सुमारास खाली सरकू लागली होती.
मोठ्या प्रमाणावर माती आणि दगड खाली कोसळल्यामुळे इमारतीलगत दुसऱ्या मजल्यापर्यंत मातीचा ढिगारा झाला. रहिवाशांची सध्या गुंदवली येथील महापालिका शाळेत तात्पुरती निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
