दहिसर ते मिरारोड मेट्रो ९’ मार्गिकेच्या कारशेडसाठी उत्तन येथे जागा
मुंबई दि.२५ :- राज्य सरकारने ‘दहिसर ते मिरारोड मेट्रो ९’ मार्गिकेच्या कारशेडसाठी उत्तन येथील डोंगरी गावातील ६९ एकर जागा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) देण्यास परवानगी दिली आहे. येत्या आठ ते दहा दिवसात ही जागा एमएमआरडीएच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे.
परिमाणी. ‘मेट्रो ९’ची कारशेड उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. दहिसर ते मीरा रोडदरम्यानचा प्रवास जलदगतीने व्हावा या उद्देशाने एमएमआरडीए १०.५ किमी लांबीच्या ‘मेट्रो ९’ मार्गिकेची उभारणी करीत आहे. ‘मेट्रो ९’चे काम वेगात सुरू असताना या मार्गिकेच्या कारशेडचा प्रश्न गंभीर बनला होता.
अध्यात्माचे महत्त्व वैज्ञानिक संशोधनातूनही सिद्ध- शॉर्न क्लार्क
मुळ आराखड्यानुसार या मार्गिकेसाठी राई, मुर्धा, मोर्वा या गावात कारशेड उभारण्यात येणार होती. मात्र येथे कारशेड उभारण्यास स्थानिक रहिवाशांनी कडाडून विरोध केला होता. अखेर रहिवाशांच्या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने राई, मुर्धा, मोर्वा येथील कारशेड रद्द केली.
