ठळक बातम्या

ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचे निधन

मुंबई दि.२५ :- ज्येष्ठ पत्रकार, एकपात्री प्रयोगकर्ते, क्रिकेट आणि चित्रपटविषयक लेखक शिरीष कणेकर यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. कणेकरी, माझी फिल्मबाजी हे त्यांचे कार्यक्रम विशेष लोकप्रिय होते. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तृतीय वर्ष कला शाखा सत्र ५ च्या पुढे ढकललेल्या परीक्षा उद्या

गेल्या महिन्यात ६ जून रोजी त्यांनी ८० वा वाढदिवस साजरा केला होता. विविध वृत्तपत्रे आणि मासिकांमधून चित्रपट, साहित्य आणि क्रीडाविषयक क्षेत्रातील विविध घडामोडींवर त्यांनी केलेले लेखन लोकप्रिय आहे .कणेकर यांची ३० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

कंगना राणावतला धमकाविल्याप्रकरणी जावेद अख्तर विरोधात फौजदारी कारवाई

इंडियन एक्सप्रेस, डेली’, ‘फ्री प्रेस जर्नल’, ‘सिंडिकेटेड प्रेस न्यूज एजन्सी या वृत्तपत्रात त्यांनी काम केले होते. गाये चला जा यादो की बारात, पुन्हा यादों की बारात , शिरिषासन, फिल्लमबाजी, कणेकरी, लगाव बत्ती, नानकटाई, चापटपोळी, मेतकूट, फटकेबाजी ही कणेकर यांची काही गाजलेली पुस्तके.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *