ठळक बातम्या

अध्यात्माचे महत्त्व वैज्ञानिक संशोधनातूनही सिद्ध- शॉर्न क्लार्क

मुंबई दि.२५ :- डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आध्यात्मिक विषयांवर अनोखे वैज्ञानिक संशोधन केले जात आहे. ऑरा आणि एनर्जी स्कॅनर आदी उपकरणे वापरून केलेले संशोधन प्राचीन भारतीय शिकवणीशी सुसंगत आहे, अशी माहिती महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे श्री. शॉन क्लार्क यांनी दिली.

ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचे निधन

‘सेवा-सेवाभाव, परोपकार आणि स्वयंसेवा’ या कार्यकारी गटाने भोपाळ येथे ‘सी-२०’ परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत ‘स्वतंत्र सेवा योगींच्या सर्वाेत्तम पद्धती’ अर्थात् ‘एकल सेवा कार्यकर्ता’ या सत्रात क्लार्क बोलत होते. हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी विश्वाला दिलेले ज्ञानही यथार्थ असल्याचे या संशोधनातून सिद्ध झाले आहे. हे संशोधन आपल्या जीवनावर सूक्ष्म जगताचा कसा प्रभाव पडतो, याचेही आकलन करून देते.

तृतीय वर्ष कला शाखा सत्र ५ च्या पुढे ढकललेल्या परीक्षा उद्या

अध्यात्म हे एक्झिमा, व्यसनाधीनता, मानसिक आजारयांसह आरोग्याशी संबंधित विविध समस्यांवर मात करण्यासाठी उपयोगी असल्याचे ते म्हणाले. संगीताच्या विविध शैली आणि त्यांचा एखाद्याच्या प्रभावळीवर होणारा परिणाम यांविषयी आध्यात्मिक संशोधन करण्यात आले. यातून उच्च आध्यात्मिक पातळीच्या संतांनी गायलेल्या भक्तीगीतांनी व्यक्तीच्या प्रभावळीवर सकारात्मक परिणाम झाल्याचे, तर हेवी मेटल संगीतामुळे व्यक्तीच्या नकारात्मक ऊर्जेत वाढ झाल्याचे क्लार्क यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *