आयकर विभागाने युवकांमध्ये कर साक्षरता निर्माण करावी – राज्यपाल रमेश बैस यांचे आवाहन
मुंबई दि.२४ :- आगामी काळात देशात करसंस्कृती विकसित करण्यासाठी आयकर विभागाने नागरिकांमध्ये विशेषतः युवकांमध्ये कर साक्षरता निर्माण करावी, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. आयकर विभागाच्या मुंबई शाखेने आयोजित केलेल्या १६४ व्या आयकर दिन कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या ९ वर्षांत सरकारने आयकर भरणे तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक सुलभ केले असून आयकर दाते वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. या कालावधीत आयकरापासून मिळणारे उत्पन्न १६७ टक्क्यांनी वाढले आहे, तर आयकर रिटर्नची संख्या २.९६ कोटींहून ७.६३ कोटी इतकी वाढली असल्याचे राज्यपाल बैस यांनी सांगितले.
पुराचे पाणी घरात घुसुन झालेल्या नुकसानीसाठी आता प्रतिकुटुंब दहा हजार रुपयांची मदत
संपूर्ण देशाच्या १६ लाख कोटी प्रत्यक्ष करापैकी एकट्या मुंबईचे योगदान पाच लाख कोटी इतके आहे. एकूण आयकरातील एकतृतीयांश योगदान एकट्या मुंबईचे असणे राज्यासाठी अभिमानास्पद आहे, असेही ते म्हणाले. आगामी काळात कृत्रिम प्रज्ञा सर्व क्षेत्रात येणार असून योग्य वापर केल्यास देशातील करदात्यांच्या संख्येत वाढ होईल, करनिर्धारण अचूक होईल, कार्यक्षमता वाढेल व कर परतावा देखील योग्य इतका व वेळेत मिळेल असे टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी सांगितले.
भारतीय मजदूर संघाच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या पुणे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष कुमार चौहान यांचेही भाषण झाले. मुंबईच्या प्रधान मुख्य आयकर आयुक्त गीता रविचन्द्रन यांनी प्रास्ताविक केले. बँक ऑफ बडोदाचे मुख्याधिकारी देबदत्त चांद, आयकर आयुक्त विनय सिन्हा, अतिरिक्त आयुक्त सौरभ देशपांडे, व्यापार संघटनांचे प्रतिनिधी तसेच आयकर विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
