वांद्रे स्थानक ते वांद्रे टर्मिनस स्कायवॉक उभारणार
मुंबई, दि. १९
पश्चिम रेल्वेतर्फे वांद्रे स्थानक ते वांद्रे टर्मिनस असा स्कायवॉक उभारण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून सप्टेंबरपासून स्कायवॉकच्या उभारणीचे काम सुरू होणार आहे.
मध्य रेल्वेतर्फे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पाची उभारणी
खार रोड आणि वांद्रे स्थानकातून वांद्रे टर्मिनसला जाण्यासाठी रिक्षाचा पर्याय आहे. मात्र रिक्षाचालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारुन प्रवाशांची लूट केली जाते.
सर्व शासकीय यंत्रणा सतर्क- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
या स्कायवॉकसाठी सुमारे २८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सप्टेंबरमध्ये काम सुरू झाल्यानंतर वर्षभरात हा पूल प्रवाशांसाठी सुरू करण्याचा पश्चिम रेल्वेचा प्रयत्न आहे. खार रोड स्थानकाहून वांद्रे टर्मिनससाठी स्कायवॉक गेल्या वर्षी सुरू करण्यात आला आहे.
—–
