ठळक बातम्या

सोमय्या यांच्या कथित वादग्रस्त चित्रफीतीबाबत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास सुरू

मुंबई, दि. १९
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार यांच्या कथित अश्लील, वादग्रस्त चित्रफीतीबाबत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास करण्यास सुरुवात केली आहे.

किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह चित्रफीतीची चौकशी व्हावी- अंबादास दानवे – सभापतींकडे पेनड्राइव्ह सादर

विधिमंडळात काल विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उबाठा गटाचे अनिल परब यांनी सोमय्या यांच्या या कथित वादग्रस्त चित्रफीतीबाबत हल्ला चढवला होता आणि सखोल चौकशीची मागणी केली होती.

किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह ध्वनीचित्रफितीमुळे खळबळ, विरोधकांकडून भाजप, सोमय्या यांच्यावर टीका – सोमय्या यांनी आरोप फेटाळले

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले होते.
तांत्रिक आणि सायबर तज्ज्ञांच्या मदतीने गुन्हे शाखा युनिट १० या चित्रफीतीची सतत्या तपासणार आहेत.

विज्ञानाधिष्ठीत सांस्कृतिक वारसा शिक्षणातून जपावा – विवेक भागवत यांचे प्रतिपादन

एका खासगी वृत्तवाहिनीने सोमवारी सोमय्या यांच्या या वादग्रस्त चित्रफीतीची बातमी प्रसारित केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *