ठळक बातम्या

कडोंमपाची नागरी सुविधा केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरू

कल्याण, दि. १६
कल्याण डोंबिवली महापालिकेने मुख्यालय आणि प्रभाग कार्यालयांमधील सर्व नागरी सुविधा केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
सुट्टीच्या दिवशीही नागरिकांना मालत्ता कर, पाणी देयक भरणा करता यावा या उद्देशाने प्रशासनाने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

कचरा संकलन केंद्रांवर तीन हजार किलो कचरा जमा

अभय योजना आणि मालमत्ता कराची चालू वर्षाची रक्कम ३१ जुलैच्या आत करदात्या नागरिकांनी भरणा केली तर त्यांना पाच टक्के परतावा (रिबेट) मिळतो. सुट्टीच्या दिवशी नागरी सुविधा केंद्र सकाळी पावणे दहा ते संध्याकाळी साडे पाच वेळेत सुरू राहणार आहेत. अधिकाधिक नागरीकांनी या सुविधेचा, वेळेत कर भरणा करुन परतावा घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *